शहरातील व्यावसायिक आणि रहिवासी इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेविषयी उदासीनता !

जिवाला धोका आहे, हे ठाऊक असूनही त्याकडे दुर्लक्ष करणारे नागरिक कठोर शिक्षेस पात्र आहेत !

कराड शहरातील सर्व अनधिकृत पशूवधगृहे भुईसपाट करण्याचे आदेश द्यावेत ! – शिवशंकर स्वामी, मानद पशूकल्याण अधिकारी

निवेदनामध्ये म्हटले आहे, कराड येथील अनधिकृत पशूवधगृहात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची अनिर्बंधपणे हत्या केली जाते. हे मांस मुंबई, पुणे, कर्नाटक आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठवले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

महाराष्ट्र सरकारची ४५ आस्थापने तोट्यांत ! – ‘कॅग’चा अहवाल

महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमांना किंवा आस्थापनांना ३ सहस्र ६२३ कोटी ४० लाख रुपये इतका तोटा झाला आहे. एकूण आस्थापनांपैकी ४५ आस्थापने तोट्यात, ४७ आस्थापने लाभात आहेत, तर १८ आस्थापनांनी ‘ना नफा ना तोटा’ अशी स्थिती दर्शवली आहे.

अंधेरी सबवे पूरमुक्त करण्यासाठी ३ – ४ वर्षे लागतील !

पाण्याचा निचरा वेगाने करण्यासाठी सबवेला समांतर रेल्वे रुळांखालून पर्जन्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

पुणे येथे चोरीची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !

राज्यघटनेतील ‘सर्वांना समान न्याय’, हे तत्त्व न पाळणारे पोलीस खाते ! हा राज्यघटनेचाही अवमान नाही का ?

चांदवड (जिल्हा नाशिक) येथे तोतया तहसीलदाराने २ व्यापार्‍यांना लुटले !

अशांना शोधून काढून त्यांच्याकडून सर्व साहित्य कह्यात घेऊन पैसेही वसूल करायला हवेत !

पोलिसांना शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा आणणार्‍या ३ धर्मांधांना अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाक नसल्याचेच लक्षण !

पिंपरी (जिल्हा पुणे) येथे नवजात बालकांची विक्री करणार्‍या ६ महिलांच्या टोळीस अटक !

आर्थिक लाभाकरता नवजात बालकांची विक्री करणार्‍या महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

शाळकरी मुलाला मारहाण करून विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद !

याविषयी १६ वर्षीय मुलाच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. शर्मा आणि तक्रारदार महिलेच्या मुलाचा वाद झाला होता.