बल्लारपूर रेल्वे दुर्घटनेत दोघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील बल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा ‘प्री कास्ट स्लॅब’चा भाग तुटल्याने १३ प्रवासी रेल्वे रुळांवर कोसळले. या दुर्घटनेत शिक्षिका नीलिमा रंगारी (वय ४८ वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर इतर १२ जणांवर उपचार चालू आहेत.

३० नोव्हेंबरपर्यंत कर भरा, अन्यथा जप्तीची कारवाई ! – शीतल तेली-उगले, महापालिका आयुक्त, सोलापूर

नागरिकांनी महापालिकेचा कर ३० नोव्हेंबरपूर्वी भरावा. यानंतर थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागास आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावरील कारवाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी बंद

अफझलखानच्या कबरीच्या बाजूला ७ खोल्या, कबरीसमोर हॉल, मुजावरांना रहाण्यासाठी खोल्यांची व्यवस्था, अशा एकूण ८ गुंठ्यात हे अनधिकृत बांधकाम झाले होते. अंततः ते पाडण्यात आले आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसूल करणार्‍या १० जणांना अटक !

नक्षली सप्ताहात नक्षलवाद्यांकडून जाळपोळ, खंडणी वसूल करणे, झाडे टाकून रस्ता बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे आदी दहशत पसरेल अशी कृत्ये करण्यात येतात.

महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही !

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना ऑनलाईन भरता येत नाही.

सनातनच्या साधकांसारखी प्रसन्नता तात्काळ आत्मसात् करायला हवी ! – सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर

सरस्वतीदेवी भालचंद्र अमृतकर यांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

जुन्नर (पुणे) येथे गोरक्षकांवर जमावाचे आक्रमण !

गोरक्षक शिवराज संगनाळे मित्रांसह जुन्नर-मढ रस्त्याने जात असतांना त्यांना ‘पिकअप’मधून जनावरे नेत असल्याचा संशय आल्याने त्यांनी जुन्नर पोलिसांना कळवले आणि गाडीचा पाठलाग चालू केला.

राहुल गांधी यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलण्याची लायकी आहे का ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

‘‘धोरण म्हणून काही गोष्ट असते. ‘सिर सलामत तो पगडी पचास’. ५० वर्षे कारागृहात सडत रहाण्यापेक्षा कृष्णनीतीने कारागृहाच्या बाहेर पडणे हे कधीही चांगले. महापुरुषांवर अशी टीका करणे आता बंद करा.

जळगाव येथे दोन दिवसांच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन !

ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आणि २९ नोव्हेंबर या कालावधीत ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे.

शिखर शिंगणापूर (सातारा) येथे आढळला शहाजीराजे यांचा शिलालेख !

येथील महादेव मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने तटबंदी आहे. या तटबंदीला अनेक खांब आहेत. त्यातील एका खांबावर कोरीव शिलालेख आढळला आहे.