प्रतापगडावरील अनधिकृत बांधकामावरील कारवाई प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावणी बंद

सातारा – प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने बंद केली. ‘मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनभूमीवरील अवैध बांधकाम पाडण्यात आले असून अझफलखानच्या कबरीची कोणतीही हानी झालेली नाही’, अशी माहिती सातारा प्रशासनाने न्यायालयाला दिली. शिवप्रातपदिनी महसूल आणि वन विभाग यांच्याकडून हे अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले होते.

अफझलखानच्या कबरीच्या बाजूला ७ खोल्या, कबरीसमोर हॉल, मुजावरांना रहाण्यासाठी खोल्यांची व्यवस्था, अशा एकूण ८ गुंठ्यात हे अनधिकृत बांधकाम झाले होते. अंततः ते पाडण्यात आले आहे.