नागपूर – नक्षलवाद्यांच्या वतीने खंडणी वसूल करणार्या १० नक्षल समर्थकांना गडचिरोली पोलिसांनी अहेरी उपविभागातंर्गत पेरमिली क्षेत्रात अटक केली आहे. २ ते ८ डिसेंबर या कालावधीत ‘नक्षली सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात नक्षलवाद्यांकडून जाळपोळ, खंडणी वसूल करणे, झाडे टाकून रस्ता बंद करणे, नक्षल स्मारक बांधणे आदी दहशत पसरेल अशी कृत्ये करण्यात येतात.
१. गडचिरोली जिल्ह्यातील बांडीया नदीवरील पुलाचे बांधकाम चालू आहे. तेथे नक्षल समर्थकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी, माओवादी दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटी या मथळ्याचे पत्र दाखवून ७० लाख रुपयांची मागणी केली; मात्र ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
खंडणी वसुलीप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी १० नक्षल समर्थकांना केली अटक https… https://t.co/lQQW1QOxse via @YouTube
— Berar Times Newspaper (@berartimes) November 27, 2022
२. यावर संतप्त झालेल्या नक्षल समर्थकांनी ५ नोव्हेंबर या दिवशी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीला बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केले. ‘पुलाचे बांधकाम पूर्ण करायचे असल्यास मागितलेली खंडणी द्या, अन्यथा आस्थापनाच्या साहित्याची जाळपोळ करून तुम्हाला ठार मारू’, अशी धमकी त्यांनी दिली. हिरव्या रंगाचा गणवेश घातलेले १० ते १२ जण सभोवती उभे होते. या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.
संपादकीय भूमिकासंपूर्ण नक्षलवाद नष्ट केल्याविना अशा घटना थांबणार नाहीत, हे सरकारने लक्षात घेऊन त्यादृष्टीने ठोस कृती करावी ! |