इंदिरा गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘धाडसी’ असा उल्लेख !

इंदिरा गांधी यांच्या या पत्राविषयी राहुल गांधी यांना काय म्हणायचे आहे ?

हिंदुद्वेषी वीर दास याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा विरोध !

वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा

यासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे !

नागपूर येथील गुंड अक्कू यादव याच्या हत्येमागे नक्षलवादी प्रेरणा !

नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून खुलासा !

आळंदी यात्रेच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ३०० बसगाड्यांचे नियोजन !

कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथे येणार्‍या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पी.एम्.पी.कडून (पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून) ३०० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.

कुर्ला (मुंबई) येथे शमीम खान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार !

मुंबई येथील कुर्ला येथे शमीम शान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील राजेश लोंढे यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्रमांकाची पाटी नसलेल्या नव्या शासकीय चारचाकी वाहनाचा विधानभवन परिसरात प्रवेश !

१५ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेचा आढावा घेऊन सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या विधानभवन परिसरात त्याच वेळी क्रमांकाची पाटी नसलेले चारचाकी शासकीय वाहन आले.

प्रतापगडावर भावी पिढीला प्रेरणा देणारा शिवरायांचा इतिहास उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील. यासाठी ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील कुंभ महोत्सव !