|
जुन्नर (जिल्हा पुणे) – गोरक्षक शिवराज संगनाळे मित्रांसह जुन्नर-मढ रस्त्याने जात असतांना त्यांना ‘पिकअप’मधून जनावरे नेत असल्याचा संशय आल्याने त्यांनी जुन्नर पोलिसांना कळवले आणि गाडीचा पाठलाग चालू केला. या वेळी हातात लोखंडी पाईप, सळई, चाकू आणि धारदार शस्त्रे घेऊन २५ ते ३० जणांचा जमाव तेथे आला अन् त्यांनी गोरक्षकांना मारहाण करण्यास चालू केली. या प्रकरणी जुन्नर येथे २७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून महंमद कुरेशी या आरोपीस अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दिली. या प्रकरणी गोरक्षक संगनाळे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी गाडी कह्यात घेतली असून यामध्ये त्यांना २ ते ३ वर्षे वयाचे देशी गोवंशाचे प्राणी मिळाले. (राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गोवंशियांची हत्या आणि वाहतूक केली जाणे, तसेच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होणे, हे संतापजनक आहे ! यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे धर्मांध मोकाट असणे, हे लज्जास्पद आहे ! |