लव्ह जिहादमुळे कन्नड अभिनेत्रीच्या संगनमताने तिच्या भावाची धर्मांध प्रियकराकडून हत्या !

लव्ह जिहादविरोधी कायदा करूनही अशा प्रकारच्या घटना थांबत नाहीत, हे पहाता हिंदु तरुणींना धर्मशिक्षण देण्याची किती नितांत आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

बेंगळुरू येथील ऑक्सफर्ड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड !

४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून ! रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मौल्यवान वस्तूंची चोरी !

अनैतिकतेने टोक गाठल्याचीच ही घटना आहे ! अशा स्थितीतून भारताला पुन्हा विश्‍वगुरुच्या स्थानी विराजमान करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार, हे लक्षात येते ! अशा चोरांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !

बागलकोट (कर्नाटक) येथील आरोग्य विभाग अधिकार्‍याला लाचखोरीच्या प्रकरणी अटक

बागलकोट जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे प्रथम दर्जा साहाय्यक महांतेश निडसनूर यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकमध्ये आजपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी

कर्नाटक सरकारन उद्यापासून म्हणजे २७ एप्रिलपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ६ ते १० पर्यंत चालू असतील. बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्र यांना अनुमती आहे.

यादगिरी (कर्नाटक) येथे खाटा नसल्याने कोरोनाबाधिताला भरती करून घेण्यास नकार

या पूर्ण प्रकरणातून रुग्णालयांचा जनताद्रोही कारभार लक्षात येतो. अशा घटना घडत असतांना कर्नाटक शासनाने त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे !

भूमी संमत करण्यासाठी निवृत्त सैनिकाकडून लाच मागणार्‍या महसूल निरीक्षकाला अटक

अशा भ्रष्टाचार्‍यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

कर्नाटकातील देवस्थानाच्या कर्मचार्‍याकडून अर्पण पेटीतील धनाची चोरी

धर्मादाय विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या या मंदिरातील भक्तांनी दिलेले अर्पण एक कर्मचारी अर्पण पेटीतून लुटत असल्याचे एका स्थानिकाने त्याच्या भ्रमणभाषद्वारे चित्रीकरण करून पकडून दिल्याची घटना घडली.

उडुपी शिरूर मठाचे उत्तराधिकारी म्हणून १६ वर्षीय अनिरुद्ध सरलाथैया यांची निवड !

धर्मस्थळातील निदले गावात रहाणारे १६ वर्षांचे अनिरुद्ध सरलाथैया यांचा उडुपीच्या ८ मध्व मठांपैकी श्री शिरुर मठाचा ३१ वा वारस म्हणून अभिषेक करण्यात येणार आहे. अनिरुद्ध सरलाथैया यांचा औपचारिक विधी १४ मे या दिवशी उत्तर कन्नड जिल्ह्यातील सिरसी येथे श्री सोडे मठ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगणार्‍या पोलिसांशी वाद घालणार्‍या लोकप्रतिनिधीच्या मुलाला अटक !

कोरोनाचे नियम भंग करून दायित्वशून्यतेने वागणार्‍या नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्षाचा मुलगा विनायक बाकळे याला अटक करण्यात आली.