‘प्रसारमाध्यमांना सांगू’ म्हटल्यावर भरती करून घेतले !या पूर्ण प्रकरणातून रुग्णालयांचा जनताद्रोही कारभार लक्षात येतो. अशा घटना घडत असतांना कर्नाटक शासनाने त्यात हस्तक्षेप करून संबंधितांवर कारवाई करणे अपेक्षित आहे ! |
यादगिरी (कर्नाटक) – येथे भीमेश नावाच्या कोरोनाबाधित रुग्णाला खाटा नसल्याचे सांगत जिल्हा रुग्णालयात भरती करून घेण्यास नकार देण्यात आला. ‘भीमेश याला काहीही झालेले नाही’, असे सांगून डॉक्टारांनी माघारी जाण्यास सांगितले होते. भीमेश यांच्या बहिणीने डॉक्टरांना त्याची स्थिती चांगली नसल्याचे सांगितल्यावर ‘डॉक्टर तू आहेस कि मी ?’ असे संबंधित डॉक्टरांनी विचारले. (यातून त्यांचा उद्दामपणा दिसून येतो ! – संपादक) या रुग्णाची स्थिती बिकट असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी ‘प्रसारमाध्यमांना याविषयी कळवतो’, असा दम दिल्यावर भीमेश यांना तात्काळ रुग्णालयात भरती करून घेण्यात आले.