कर्नाटकमध्ये आजपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारन उद्यापासून म्हणजे २७ एप्रिलपासून १४ दिवसांची दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. दुकाने सकाळी ६ ते १० पर्यंत चालू असतील. बांधकाम, शेती आणि उत्पादन क्षेत्र यांना अनुमती आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असेल. राज्य आणि राज्याबाहेर प्रवास करण्याची अनुमती नसेल; मात्र अत्यावश्यक प्रकरणात सूट दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी देहली, राजस्थान आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये १५ दिवसांची दळणवळण बंदी लावण्यात आली आहे.