मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यावे !  गोविंद गावडे

मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची आवश्यकता आहे, असे विधान गोव्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘‘मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे मुलांची वैयक्तिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख विकसित होते.

केंद्रीय गृहखात्याच्या निर्णयामुळे विदेशातील भारतियांना दिलासा

केंद्रीय गृहखात्याने विदेशात असलेल्या काही श्रेणींमधील भारतियांना भारतात परतण्याविषयीचे नियम शिथिल केल्याने विदेशातील भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या वैश्‍विक संकटात दिसलेली दानशूरता !

सध्या ‘कोरोना’च्या रूपात आलेले संकट हे वैश्‍विक संकट म्हणून भारतियांसमोर आहे. ‘दातृत्व’ हा विशेष गुण भारतियांमध्ये आहे. तो या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळत आहे.

प्राणीमित्राच्या तक्रारीनंतर बाणावली येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची धाड

एका प्राणीमित्राने केलेल्या तक्रारीची नोंद घेऊन बाणावली येथे सेंट पॉल चॅपेलजवळ मजिद बेपारी याच्या घरी अवैधरित्या चालणार्‍या पशूवधगृहावर कोलवा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी धाड घालून एकाला कह्यात घेतले.

परिचारिकांची फेरमुलाखत घेऊन त्यांना ४८ घंट्यांत कामावर घेऊ !

सध्या कोविड-१९ विरुद्धच्या युद्धात योद्धे म्हणून डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कौतुकाचा वर्षाव चालू आहे. अशा वेळी गोवा शासनाने १४ परिचारिकांना बडतर्फ करण्याचा आदेश दिला आहे.

अभाविपकडून दहावीच्या ३ सहस्र विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) गोवा विभागाने दहावीची परीक्षा देणार्‍या ३ सहस्र विद्यार्थ्यांना २२ मे या दिवशी मास्क वाटले.

विमानाने येणार्‍या प्रवाशांची ‘अ‍ॅन्टीबॉडी’ चाचणी करण्यासंबंधी गोवा शासनाची नागरी विमानसेवा खात्याला विनंती

सोमवारपासून गोव्यातील विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा चालू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विमानातून आलेल्या प्रवाशांची अ‍ॅन्टीबॉडी चाचणी करण्याविषयी नागरी विमान खात्याला विनंती केली आहे.

मंत्र्यांची संख्या अल्प करा ! – सुदिन ढवळीकर, आमदार, मगोप

कोविड-१९ महामारीमुळे सध्या गोव्याची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे गोवा शासनानेही कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे खर्च वाचवण्यासाठी मंत्र्यांची संख्या अल्प करावी, अशी मागणी मगोपचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शासनाकडे केली आहे.

परराज्यात अडकलेल्या गोमंतकियांना परत आणेपर्यंत विमानसेवा चालू न करण्याविषयी केंद्रशासनाला सांगावे ! – रोहन खंवटे

परराज्यात अडकलेल्या गोमंतकियांना गोव्यात परत आणेपर्यंत इतर राज्यांतील लोकांना गोव्यात येण्यासाठी विमानसेवा चालू करू नये, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केंद्रशासनाला स्पष्ट सांगावे, असे विधान अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केले आहे.