गोव्यात ख्रिस्ती अल्प झाले; मात्र मुसलमानांची लोकसंख्या वाढली ! – राज्यपाल श्रीधरन् पिल्लई

गोव्यातील पूर्वीचे स्थानिक मुसलमान येथील अन्य धर्मियांशी धार्मिक सलोखा राखून आहेत; पण परराज्यांतील मुसलमानांनी येथे येऊन शांतताप्रिय आणि धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यातील वातावरण गढूळ केले आहे.

समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे शासनाचे प्राधान्य

पुढील मासापासून पर्यटन हंगामाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही’ बसवणे आणि दलालांवर कारवाई करणे, हे प्राधान्य नजरेसमोर ठेवले आहे.

पुढील वर्षी पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याची शिक्षण खात्याची सिद्धता

या धोरणाच्या अंतर्गत पुढील वर्षी इयत्ता तिसरी आणि सहावी यांचा अभ्यासक्रम पालटण्यात येणार असल्याची माहिती ‘एस्.सी.ई.आर्.टी.’च्या संचालिका मेघना शेटगावकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

गणेशोत्‍सवानिमित्ताने ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद !

‘ओम प्रमाणपत्र’ ही एक चळवळ ही हिंदूसंघटनासाठी, तसेच हिंदूंच्‍या अस्‍तित्‍वासाठी राबवण्‍यात आलेली चळवळ आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली चालू झालेल्‍या या चळवळीसाठी ‘ओम प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून आढावा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ३ सप्टेंबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणविषयक सुकाणू समितीच्या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमधील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानामध्ये सहभागी व्हा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

‘हलाल प्रमाणीकरणा’तून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे.

हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने सांकवाळ (शंखवाळ) येथील श्री विजयादुर्गा वारसास्थळ-मुक्ती जागरण मोहिमेचा शुभारंभ !

आतापर्यंत गेली १० वर्षे या भूमी बळकावण्याच्या प्रकरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केलेल्या गोवा सरकारवर जनशक्तीचे दडपण आणण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात जशी अयोध्या, तितकेच महत्त्वाचे हे सूत्र गोव्यात उचलून धरणार असल्याचे हिंदू रक्षा महाआघाडीने घोषित केले आहे.

पर्वरी येथील आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विज्ञापन हटवले

पिनोझ पिझ्झा’ या आस्थापनाने श्री गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे विडंबनात्मक विज्ञापन हटवून त्या ठिकाणी श्री गणेशाचे नवीन चित्र लावले आहे. हिंदु जनजागृती समितीने केलेल्या प्रबोधनानंतर विडंबनात्मक विज्ञापन हटवण्यात आले आहे.