कणकुंबीनंतर आता नेर्से, खानापूर येथून पाणी वळवण्यासाठी कर्नाटकच्या हालचाली

म्हादईचे पाणी कणकुंबी येथून कर्नाटकमध्ये मलप्रभा नदीत वळवण्याचे काम पूर्ण केल्यानंतर आता कर्नाटकने कळसा आणि भंडुरा नाल्यांचे पाणी नेर्से, खानापूर येथून कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने मुसलमान गोव्यात शक्तीप्रदर्शनसाठी गोव्यात आल्याचा संशय !

काणकोण येथे ईदनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यास हिंदूंनी विरोध केल्यानंतर या जुलूसमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले शेजारील राज्यांतील मुसलमान काणकोण, कुंकळ्ळी आणि मडगाव येथील समुद्रकिनार्‍यांवर दिसत आहेत.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला दाद न देता हणजूण येथे अनेक नाईट क्लब चालूच !

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्यक्षात जाऊन क्लब बंद पाडण्याचे अधिकार नसल्याचे क्लबवाल्यांना ठाऊक आहे. त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्याशी संगनमत साधून क्लब अनधिकृतरित्या चालू आहेत !

गोव्यात मागील ४ वर्षांत चोरट्यांनी ५८ धार्मिक स्थळांना केले लक्ष्य !

गोव्यात जानेवारी २०२० ते जून २०२४ या कालावधीत मंदिरे, चर्च आणि चॅपल (लहान स्वरूपातील चर्च) मिळून एकूण ५८ धार्मिक स्थळांना लक्ष्य केले आहे आणि यामध्ये रोख रक्कम, सोन्या-चांदीच्या वस्तू मिळून लाखो रुपयांची चोरी करण्यात आली आहे.

पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाला कुळे-शिगाव आणि मोले पंचायत यांचा विरोध

केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान पालट खात्याने पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभागाचा मसुदा सिद्ध केला असून यामध्ये कुळे भागातील सर्व गावांचा समावेश आहे.

काणकोण येथे जुलूस काढायला प्रशासनाने अनुमती नाकारली

सर्वत्रच्या नागरिकांनी अशी सतर्कता बाळगल्यास गोव्यात शांतता नांदेल !

बांधकाम व्यावसायिक अभिनंदन लोढा यांनी गोव्याविषयीचे आक्षेपार्ह विज्ञापन हटवले

राज्यशासनाच्या गृह खात्याने १२ सप्टेंबर या दिवशी ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या बांधकाम व्यवसायातील आस्थापनाला वादग्रस्त विज्ञापन हटवण्याचे निर्देश दिले होते.

करंझाळे (गोवा) येथे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून समुद्रकिनार्‍यावर दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतरची घटना

करंझाळे समुद्रकिनार्‍यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून किनारी आल्या आहेत. ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. अंदाजे ५-६ श्री गणेशमूर्ती पाण्यात तरंगतांना दिसत आहेत.

खराब रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीत टाकणार ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीमध्ये टाकले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते बांधणार्‍या कंत्राटदारांना दिली आहे.