‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानामध्ये सहभागी व्हा ! – हिंदु राष्ट्र समन्वय समिती

डावीकडून श्री. विनोद वारखंडकर, श्री. सलील बांदोडकर, श्री. सूजन नाईक, श्री. सत्यविजय नाईक, श्री. जयेश थळी, श्री. संजू कोरगावकर, श्री. नितीन फळदेसाई, श्री. परशुराम गणाचरी आणि श्री. प्रवीण चौधरी

पणजी – ‘हलाल प्रमाणीकरणा’तून मिळालेल्या पैशांचा वापर आतंकवाद्यांना कायदेशीर साहाय्य देण्यासाठी केला जात आहे. ‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांमध्ये जनजागृती करण्यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समिती ‘हलालमुक्त भारत’ अभियानाच्या अंतर्गत ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ हे अभियान राबवणार आहे. ‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानात सहभागी होणे, हे धर्मरक्षणच आहे. प्रत्येक गणेशभक्ताने गणेशोत्सवात ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचा वापर न करता या अभियानामध्ये सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन हिंदु राष्ट्र समन्वय समितीने येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला सर्वश्री सत्यविजय नाईक, विनोद वारखंडकर, सलील बांदोडकर, परशुराम गणाचरी, प्रवीण चौधरी, संजू कोरगावकर, नितीन फळदेसाई, सूजन नाईक आणि जयेश थळी यांची उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेत उपस्थित वक्त्यांनी पुढील माहिती दिली. भारत सरकारची ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण संस्था’ (FSSAI) आणि अन्न अन् औषध प्राधिकरण (FDA) यांसारख्या खाद्यपदार्थांचे प्रमाणीकरण करणार्‍या शासकीय संस्था अस्तित्वात असतांनाही ‘हलाल’ प्रमाणपत्राद्वारे समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. पूर्वी मांसापुरती असणारी मूळ ‘हलाल’ ही इस्लामी अर्थात् एक धार्मिक संकल्पना आज अन्नधान्य, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, शाकाहारी पदार्थ, औषधे, पर्यटन, बांधकाम व्यवसाय, हॉटेल, मॉल आदी प्रत्येक क्षेत्रांत लागू करण्यात आली आहे. ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून ८० टक्के हिंदु समाजावर हलालची सक्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक हिंदूने गणेशोत्सवात ‘हलाल’ प्रमाणीकरणाच्या भीषणतेविषयी विविध माध्यमांतून जनजागृती करणे, शासनाला निवेदन देणे आदी प्रकारे ‘हलाल मुक्त गणेशोत्सव’ अभियानामध्ये सहभागी व्हावे.