बंदी असूनही फोंडा येथे विसर्जनस्थळी आढळल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या २० श्री गणेशमूर्ती !

गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती विक्रीवर बंदी असूनही यंदा फोंडा परिसरात श्री गणेशचतुर्थीनंतर विविध विसर्जन स्थळांवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एकूण २० मूर्ती आढळल्या आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकार्‍याला रुग्ण अरिफ सिद्दिकी याच्याकडून मारहाण

उपचार करणार्‍या आधुनिक वैद्यांविषयी कृतज्ञता सोडाच त्यांच्यावरच आक्रमण करणारे धर्मांध !

बजरंग दलाकडून मडगाव येथील अनधिकृत पशूवधगृहातून २ गुरांना जीवदान !

निवासी इमारतीत पशूवधगृह चालवायला देणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !

विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे मानसिक छळ केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी चेतावणी शिक्षण खात्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडवांत चरबी आणि माशांचे तेल मिसळणार्‍यांवर तात्काळ गुन्हे नोंद करा !

मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, मात्र तो बनवण्यापासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक जणही धर्मपरायण हिंदु असावा. हिंदु समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर कारवाई

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणार्‍या ४ कारखान्यांवर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करून या कारखान्यांना काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रस्त्यावर कचरा टाकणार्‍यांना दंड करणार ! – मुख्यमंत्री सावंत

रस्त्यावर कचरा टाकणार्‍या व्यक्तीला मोठा दंड करून त्याचे वाहन जप्त करण्यात येईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोमंतक मंदिर महासंघाच्या वतीने पणजी येथे आज आंदोलन

जगभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर गोष्ट आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदूंमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई

डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता.

अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका

गोवा शासन ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’ (व्यवसाय सुलभरित्या करता येणे) किंवा ‘डिजिटल’ कार्यप्रणाली यांना प्रोत्साहन देत असली, तरी अपेक्षित सुरक्षेच्या अभावी शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका आहे.