पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणामुळे कलम ३७० हटवावे लागले !

फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामुळे जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवावे लागले, अशी भूमिका केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केली.

२ सप्टेंबरला ‘आदित्य-एल् १’ यान सूर्याकडे झेपावणार !

‘इस्रो’ची ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वी ठरल्यानंतर आता येत्या २ सप्टेंबर या दिवशी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य-एल् १’ हे यान श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाणार आहे.

चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा ! – स्वामी चक्रपाणी महाराज, अध्यक्ष, हिंदु महासभा

भारताचे चंद्रयान-३ चंद्रावर उतरल्यानंतर आता हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी ‘चंद्राला ‘हिंदु सनातन राष्ट्र’ घोषित करा’, अशी मागणी केली आहे.

देहलीतील ८ मेट्रो स्थानकांवर खलिस्तानवाद्यांनी लिहिल्या भारतविरोधी घोषणा !

खलिस्तानी संघटनेवर बंदी घालूनही ती अशा प्रकारे कारवाया करून देश-विदेशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करत आहे. सुरक्षादलांनी अशा संघटनांची पाळेमुळे खणून काढून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्याची आवश्यकता आहे ! असे का होत नाही ?, याचा विचार सरकारने करणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘मोदी चंद्राचे मालक नाहीत, जग आपल्यावर हसेल !’ – काँग्रेसचे नेते राशिद अल्वी

भारताच्या प्रतिष्ठेची एवढी काळजी असणारे अल्वी हे काँग्रेस आणि तिचे राहुल गांधी यांच्यासारखे नेते यांच्या हास्यास्पद वक्तव्यांमुळे जगात भारताचे हसे होत आहे, याविषयी कधी काही बोलत का नाहीत ?

प्रक्षोभक भाषणांविषयीची मार्गदर्शक तत्त्वे लागू न केल्यावरून सर्वोच्च न्यायालय राज्यांवर अप्रसन्न

सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशील विषयांच्या संदर्भात आदेश देऊनही राज्यांकडून जर त्याचे पालन होत नसेल, तर जनतेच्या तक्रारींना प्रशासन किती न्याय देत असेल ?, हे लक्षात येते ! या संदर्भात न्यायालयाने राज्यांवर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

चीननेच भारताकडे केली होती द्विपक्षीय बैठकीची मागणी ! – भारत

भारताकडून नव्हे, तर चीनकडूनच द्विपक्षीय बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे पत्रकारांना दिली.

मणीपूर हिंसाचाराचे खटले गौहत्ती (आसाम) येथे चालणार

मणीपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) नोंदवलेले खटले आसामची राजधानी गौहत्ती येथे स्थलांतरित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

(म्हणे) ‘मणीपूरमधील हिंसाचार धार्मिकतेमुळे झालेला नाही !’ – अमेरिकेतील संघटनेचा निष्कर्ष

हिंसाचारामागे विदेशी हस्तक्षेप असल्याची वर्तवली होती शक्यता !

संबंध सुधारण्यासाठी लडाख सीमेवर शांतता निर्माण करणे आवश्यक !

पंतप्रधान मोदी यांचे जिनपिंग यांना प्रतिपादन
ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट