चीननेच भारताकडे केली होती द्विपक्षीय बैठकीची मागणी ! – भारत

भारताच्या मागणीवरून मोदी-जिनपिंग भेट झाल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळला

डावीकडून पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग

नवी देहली – भारताकडून नव्हे, तर चीनकडूनच द्विपक्षीय बैठकीची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी येथे पत्रकारांना दिली. ब्रिक्स परिषदेच्या वेळी दोन्ही देशांमध्ये औपचारिक संभाषण झाले नाही; परंतु ‘लीडर्स लाउंज’मध्ये पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली. भारताच्या मागणीवरून या २ नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला.