संबंध सुधारण्यासाठी लडाख सीमेवर शांतता निर्माण करणे आवश्यक !

  • पंतप्रधान मोदी यांचे जिनपिंग यांना प्रतिपादन

  • ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

नवी देहली – दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स देशांच्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात धावती भेट झाली. या वेळी शी जिनपिंग यांच्याशी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होणे आवश्यक आहे’, असे प्रतिपादन केले. ‘या भेटीत अधिकारीस्तरावर चालू असलेल्या द्विपक्षीय चर्चेची व्याप्ती वाढवण्यावर दोघांचे एकमत झाले’, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विनय क्वात्रा यांनी दिली.

क्वात्रा यांनी सांगितले की, सीमाभागात शांतता रहाणे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर केला जाणे, हे भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर सीमेवरील तणाव न्यून करण्यासाठी चालू असलेल्या सैनिकी अधिकारी स्तरावरील चर्चेची गती वाढवण्याचा आदेश आपापल्या अधिकार्‍यांना देण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.