(म्हणे) ‘काश्मीरचा प्रश्‍न शांततेने सोडवला पाहिजे !’ – चीन

काश्मीरचा प्रश्‍न पाकने जगाच्या कोणत्याही व्यासपिठावर उपस्थित केला, तरी काश्मीर भारताचे आहे आणि पुढेही रहाणार आहे, हे त्याने लक्षात ठेवावे ! तिबेट, तैवान आदींसारखे प्रदेश धाकदपटशाहने गिळंकृत करणार्‍या चीनचा हा सल्ला म्हणजे ‘सौ चुहें खाके बिल्ली हज को चली’, या प्रकारातला आहे !

(म्हणे) ‘हिवाळी ऑलिंपिक’मध्ये कोरोनावर निर्बंध घालण्याच्या चीनच्या प्रयत्नांचे विदेशी पत्रकारांकडून कौतुक !’

पत्रकारितेतील ‘वस्तुनिष्ठता’ हा साधा नियमही न पाळणारे ‘ग्लोबल टाईम्स’ वृत्तपत्र ! अविश्‍वासार्ह वृत्तांचा भरणा असलेले हे वृत्तपत्र म्हणे ‘ग्लोबल’ !

चीनमधील हिवाळी ऑलिंपिकमध्ये मशालवाहक म्हणून गलवान संघर्षातील सैन्याधिकारी

‘पडलो तरी नाक वर‘ अशाच मानसिकतेचा चीन ! यातून चीन गलवान संघर्षातील त्याच्या सैन्याधिकार्‍यांना महत्त्व देतो, असा भारताला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात येते !

चीनमध्ये ‘हिवाळी ऑलिंपिक २०२२’च्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक वाढ

चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यापासून चीनने ‘झिरो कोविड’ धोरण अवलंबले आहे. यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर चाचणी केली जाते.

सोव्हिएत संघाप्रमाणे चीनचे तुकडे होऊ शकतात !  

चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.

भूतानच्या प्रदेशात चीनकडून गावांची उभारणी !

भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !

अलगीकरणाच्या नावाखाली चीन तेथील लोकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये करत आहे बंद !

‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती

(म्हणे) ‘संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम भारतीय सैनिकांच्या मनावर होईल !’

चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य

चीन सैन्याने भारताच्या नियंत्रणातील गलवान खोर्‍यात त्याचा राष्ट्रध्वज फडकावलेला नाही ! – भारतीय सैन्याचे स्पष्टीकरण

‘चीनच्या सैनिकांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडकावल्याची जागा चीनच्या कह्यात असलेल्या गलवान खोर्‍याच्या भागातील आहे’, असे म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

चीनने अरुणाचल प्रदेशातील १५ स्थानांची नावे पालटली !

भारतातील राज्यातील स्थानांची नावे पालटण्याचे धाडस चीन करतोच कसा ? चीनवर भारताचा धाक नाही का ? भारत सरकारने आता चीनमधील स्थानांची नावे पालटून त्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे !