चीनमध्ये बुलेट ट्रेन रुळावरून घसरल्याने चालकाचा मृत्यू
चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.
चीनच्या गुइझोऊ प्रांतात भूस्खलनामुळे बुलेट ट्रेनचे २ डबे रुळावरून घसरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला, तर ७ प्रवासी घायाळ झाल्याची घटना ४ जून या दिवशी घडली.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राचे माजी संपादक डेंग यूवेन यांच्या मते, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये, यासाठी जिनपिंग कोरोनाविषयी बोलणे टाळत आहेत.
चीनच्या हेनान प्रांतात बर्ड फ्लूच्या ‘एच्३एन्८’ प्रकाराच्या पहिल्या मानवी संसर्गाची नोंद झाली आहे. जगात बर्ड फ्लूचा माणसामध्ये आढळलेला हा पहिलाच संसर्ग आहे.
चीनच्या शांघाय शहरात एकाच दिवसात कोरोनामुळे ५१ मृत्यू झाल्याची नोंद झाली, तर बीजिंगमध्येही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराच्या उच्चभ्रू भागात कोरोनाच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत.
दळणवळण बंदीमुळे चीनच्या विकासदरावर परिणाम होत आहे. चीनचा तंत्रज्ञान उद्योग ठप्प आहे.
चिनी सरकारच्या ‘डायनॅमिक झीरो पॉलिसी’ म्हणजे परिस्थितीनुरूप कोरोनाला पूर्ण पायबंद करण्याच्या धोरणामुळे अनेक प्रांतांमध्ये दळणवळण बंदी कठोरतेने राबवली जात आहे.
चीनमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या शांघायमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. गेल्या २४ घंट्यांत ४ सहस्रांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.
चीनच्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी चीनने कार्यान्वित केलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ही कुचकामी ठरतांना दिसत आहे.
नागरिकांना अन्नधान्य पुरवठ्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. व्यवसाय बंद असतांना अनेकांसमोर ‘घराचे भाडे कसे देणार ?’ असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नागरिकांनी दळणवळण बंदी मागे घेण्याची आग्रही मागणी केली आहे.