‘जी २०’ची बैठक जम्मू-काश्मीरमध्ये घेण्यास चीनचा विरोध !

बीजिंग (चीन) – ‘जी २०’ या देशांच्या परिषदेचे अध्यक्षपद यावर्षी भारताकडे आहे. भारताकडून या परिषदेचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करण्यात येणार आहे. याला यापूर्वी पाकने आणि आता चीननेही विरोध केला आहे.

१. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, काश्मीरविषयीचे चीनचे धोरण स्पष्ट आहे. हे सूत्र भारत आणि पाकिस्तान यांमध्ये पूर्वीपासूनच आहे. याविषयी संयुक्त राष्ट्रांचा संबंधित प्रस्ताव आणि द्विपक्षीय सहमती यांनुसार योग्य तोडगा निघणे आवश्यक आहे.

२. ‘जी २०’चे सदस्य म्हणून चीन बैठकीत सहभागी होईल का ?, या प्रश्‍नाचे उत्तर देतांना लिजियान यांनी सांगितले की, बैठकीत सहभाग घ्यावा किंवा नाही, याविषयी विचार करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

‘चीनने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसू नये अन्यथा चीनकडून शिनजियांगमध्ये मुसलमानांवर करण्यात येणार्‍या अत्याचारांविषयी भारत तोंड उघडेल’, अशा शब्दांत भारताने चीनला सुनावण्याची आवश्यकता आहे !