Hazaribagh Violence : हजारीबाग (झारखंड) येथील मशिदीजवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मुसलमानांकडून दगडफेक

  • अनेक हिंदु महिला घायाळ

  • श्रीरामनवमीलाही झाले होते आक्रमण

हजारीबाग (झारखंड) – येथील झुरझुरी गावात ९ दिवस चालणार्‍या श्री श्री शतचंडी महायज्ञ अंतर्गत १३ एप्रिल या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला मोठ्या प्रमाणात घायाळ झाल्या. या दगडफेकीसह येथे जाळपोळही करण्यात आली. दगडफेकीमुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी येथील रस्त्यावर निदर्शने केली. त्यांनी रस्ता बंद करून दंगलखोरांवर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी कसेतरी निदर्शकांना समजावले आणि रस्ता मोकळा केला. (धर्मांध मुसलमानांवर कारवाई करण्याऐवजी पीडित हिंदूंनाच शांत बसवून घरी पाठवणारे पोलीस कधीतरी कायदा आणि सुव्यवस्था राखू शकतील का ? अशा पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केल्यावर तरी ते कारवाई करतील का ? – संपादक)

या हिंसाचारानंतर पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. (आक्रमण झाल्यानंतर बंदोबस्त वाढवणारे पोलीस म्हणजे वराती मागून घोडे नेणारे होत ! देशात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदीच्या ठिकाणी मुसलमानांकडून आक्रमणे केली जातात, हे ठाऊक असतांना पोलिसांनी आधीच या मशिदीची पडताळणी करून तेथे पोलीस का तैनात केले नाहीत ? – संपादक)

प्रशासनाने लोकांना कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. (शांतता हिंदु जनता नाही, तर धर्मांध मुसलमान भंग करतात, हे ठाऊक असतांना अशा मुसलमानांवर कारवाई करण्याऐवजी असे आवाहन करणारे प्रशासन ! – संपादक)

हजारीबागमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंच्या मिरवणुकांवर होत आहेत आक्रमणे !

हजारीबागमध्ये सातत्याने हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमणे होत आहेत. यापूर्वी २६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी मुसलमानांनी दगडफेक केली. त्यानंतर २६ मार्च २०२५ या दिवशी येथील झंडा चौकात श्ररामनवमी उत्सवानिमित्त निघालेल्या मंगळा मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली. त्या वेळी पोलीस उपायुक्त नॅन्सी सहाय यांनी सांगितले होते की, मिरवणुकीत लावलेल्या काही गाण्यांवर इतर समुदायांच्या लोकांनी आक्षेप घेतला. यातून वाद होऊन हाणामारी आणि दगडफेक झाली.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मिरवणुकांवर ज्या मशिदींतून दगडफेक केली जाते, त्यांना कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचा निर्णय का घेतला जात नाही ?
  • झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे सरकार हिंदूंचेच रक्षण करण्यास नाही, तर राज्यातील आदिवासींचेही रक्षण करण्यासही अपयशी ठरले आहे. लवकरच झारखंड मुसलमानबहुल झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !