UP Minor Kidnapped N GangRaped : उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद येथे चार मुसलमानांकडून १४ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण आणि दोन महिने सामूहिक बलात्कार !

एकाला अटक

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) : उत्तरप्रदेशातील मुरादाबादमध्ये चार मुसलमान तरुणांनी एका १४ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण केले, तसेच तिला दोन महिने ओलीस ठेवले आणि तिच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार केला. या काळात त्या धर्मांध तरुणांनी तिला बलपूर्वक गोमांसही खायला लावले. एवढेच नाही तर तिच्या हातावरील ‘ओम टॅटू’ पुसण्यासाठी त्यांनी ‘ॲसिड’ ओतले आणि तिचा हात जाळून टाकला. मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सलमान याला अटक केली आहे.

१. हे प्रकरण मुरादाबादमधील भगतपूर परिसरातील दौलपुरी बामनिया या गावतील आहे. तेथील एका हिंदु कुटुंबातील १४ वर्षांची मुलगी २ जानेवारी २०२५ या दिवशी बेपत्ता झाली होती. यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तिचा बराच शोध घेतला; पण ती कुठेही सापडली नाही.

२. २ जानेवारी या दिवशी सलमान, जुबैर, रशीद आणि आरिफ यांनी तिचे कारमधून अपहरण केले. वाटेत तिला अंमली पदार्थ खाऊ घालून बेशुद्ध करण्यात आले.

३. त्या चौघांनी तिला ओलीस ठेवले आणि तिच्यावर अनेक वेळा सामूहिक बलात्कार केला. या काळात आरोपींनी तिला उपाशी ठेवले. जेव्हा जेव्हा ती काही खायला मागायची, तेव्हा ते तिला गोमांस खायला द्यायचे.

४. हे सर्व एका बंद खोलीत २ महिने चालू राहिले. एक दिवस संधी पाहून पीडिता कशीबशी तेथून निसटली आणि तिच्या घरी पोचली. मुलीने तिच्या कुटुंबियांना ही घटना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी भगतपूर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल (प्रविष्ट) केली.

५. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सलमान नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे.उर्वरित तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलिस ठिकठिकाणी छापे घालत आहेत.

संपादकीय भूमिका

जोपर्यंत लव्ह जिहाद्यांना त्वरित फाशीची शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत, हे सरकारच्या अद्यापही लक्षात कसे येत नाही ?