Karnataka Waqf Claims Mangaluru School : मंगळुरूच्या शाळेची जागा वक्फची मालमत्ता असल्याचा दावा !

१०० वर्षांपूर्वी शाळेला जागा भाडेतत्त्वावर दिल्याचा वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षाचा कांगावा !

मंगळुरू (कर्नाटक) – शहरातील डोंगरकेरी येथे असलेल्या केनरा शाळेची जागा वक्फ मालमत्ता आहे, असा दावा वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष एन्.के.एम्. शाफी सादी यांनी केला आहे. दक्षिण कन्नड जिल्हा वक्फ सल्लागार समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी केंद्रीय वक्फ सुधारणा कायदा मागे घेण्याची मागणीही या वेळी केली.

‘शाळेची जागा कच्छी मेमन मशिदीच्या ‘वक्फ’ची असून १०० वर्षांपूर्वी यातील एक एकर जागा शाळेला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. १०० वर्षांपूर्वी या जागेसाठी प्रतिवर्षी १०० रुपये उत्पन्न, म्हणजेच भाडे वक्फकडे जमा होत असे. कराराच्या वेळी ‘केनरा शाळेत २ मुलांना उर्दू भाषा शिकवावी’, असेही ठरले होते; मात्र गेल्या १२ वर्षांपासून हे भाडे मिळणे थांबले आहे. ‘कच्छी मेमन मशिदी’च्या नोंदींनुसार ही जागा आमची आहे’, असा थयथयाटही शाफी सादी यांनी केला.

संपादकीय भूमिका 

असा दावा करणार्‍यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?