संपादकीय : धर्मांधांना बंदी का नाही ?

अहिल्यानगर येथील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्री कानिफनाथ यात्रेत ग्रामस्थांनी मुसलमान व्यापार्‍यांना व्यापार करण्यास बंदी घातली होती. मुसलमान व्यापारी यात्रेतील नियम पाळत नाहीत आणि गैरप्रकार करतात. त्यामुळे ही बंदी होती. गावाच्या सरपंचांचे म्हणणे होते की, यात्रेच्या काळात महिनाभर देवाला तेल लावलेले असते. हा दुखवट्याचा कालावधी असल्याने या काळात आम्ही कोणतेही शुभकार्य करत नाही. शेतीची कामे करत नाही. तेलात तळलेले पदार्थ खात नाही. गादी आणि खाट वापरत नाहीत; मात्र गावात आलेले मुसलमान व्यापारी ही परंपरा पाळत नाहीत. त्यामुळे गावकर्‍यांच्या भावना दुखावल्या जातात. हा ठराव केल्यामुळे राज्यात त्याचे मोठे पडसाद उमटले. माध्यमांनी हा विषय उचलून धरला. परिणामी हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत गटविकास अधिकार्‍याने रहित केला. याच पार्श्वभूमीवर मढी येथे झालेल्या सभेत बंदरे विकास मंत्री श्री. नितेश राणे यांनी गटविकास अधिकार्‍यांनाच चेतावणी दिली, तसेच ठरावाला पाठिंबा देऊन सांगितले की, मढी ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला आहे, तो इतिहासामध्ये लिहिला जाणार आहे. या गावातील कडवट विचारांचे हिंदू जागृत झाले आहेत. या गावाने घेतलेला निर्णय देशाला दिशा देणारा आहे. हिंदु धर्माला आव्हान देण्याचे काम केले, तर मढी गावाने घेतलेला निर्णय महाराष्ट्रभर घेतला जाईल.

ऐतिहासिक निर्णय !

मढी गावातील ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय खरे म्हटले , तर ऐतिहासिकच म्हणावा लागेल. ग्रामसभेच्या ठरावाला पुष्कळ महत्त्व असते. हा विषय ग्रामसभेचा ठराव होऊन संमत झाला, म्हणजेच ‘ग्रामस्थांचा या निर्णयाला पाठिंबा आहे’, असे सिद्ध होते. ग्रामस्थ हा कानिफनाथ महाराजांचा महोत्सव अनेक वर्षांपासून साजरा करत आहेत. याच वर्षी त्यांना मुसलमान व्यापार्‍यांवर बंदी घालावीशी का वाटली ? त्यांना काहीतरी अडचण जाणवली असणार; म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला आहे. पुरो(अधो)गाम्यांनी या विषयावरून त्वरितच हिंदु-मुसलमान असा रंग देण्याची आवश्यकता नाही. एम्.आय.एम्. पक्षाच्या म्हणण्याप्रमाणे ‘हे मुसलमानांविरुद्ध अघोषित युद्धही आहे’, असेही नाही. येथे गावाच्या आणि हिंदु धर्मियांच्या प्रथा-परंपरेचा प्रश्न आहे. म्हणजे हिंदूंना हिंदु धर्मपालन करण्याचे काही अभिव्यक्तीस्वातंत्र्य (जे इतरांना या शब्दाचा उच्चार करण्यापूर्वीच मिळते.) ते नाहीच का ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना स्वत:च्या काही धार्मिक गोष्टी जपण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्याचेही स्वातंत्र्य नाही का ? हिंदूंनीच सातत्याने कमीपणा घ्यायचा, जुळवून घ्यावे, हा अट्टहास कशासाठी ? बहुसंख्य मुसलमानांच्या देशात जसे बांगलादेश, पाकिस्तान येथे हिंदूंच्या दुर्गापूजेचे मंडप जाळले जातात, उद्ध्वस्त केले जातात; कारण काय तर तेथील पूजा आणि भक्तीगीते यांमुळे धर्माधांना त्रास होतो. केवळ त्रासाचे निमित्त काढून मूर्ती फोडणे, मंडप पाडणे केले जाते, या धर्मांधतेला काय म्हणावे ? बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदू असे काही करतात का ? एवढेच काय, काश्मीर येथील अनेक हिंदु मंदिरे स्थानिक मुसलमानांनी ९० च्या दशकात पाडली आहेत. काश्मीर येथे वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकांच्या वेळी एक महिला पत्रकार काश्मीर खोर्‍यात जाऊन तेथील मुसलमानांना प्रश्न विचारते की, हिंदूंची जी मंदिरे पाडली, ती पुन्हा उभी करण्याविषयी तुमचे मत काय ? त्या वेळी मुसलमान अगदी निलाजरेपणाने आणि उर्मटपणे सांगतात की, हिंदु मंदिर बांधले की, आम्ही ते पुन्हा पाडून टाकू; कारण आम्हाला आमच्या भूमीत हिंदु मंदिर सहन होत नाही. एवढी धर्मांधता भारतातील एका राज्यात तेथील हिंदूंचा वंशविच्छेद करून काही भागांत मुसलमानांची संख्या वाढल्यावर जोपासली जाते आणि भारतातील कोणत्याही राज्यातील मुसलमानांकडून त्याचा निषेध केला जात नाही, हे आश्चर्यकारक नाही का ? म्हणजे हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी मुसलमानांकडून काही गैरप्रकार होत असतांना त्याचा कायदेशीर विरोध केला, तर ‘वातावरण बिघडेल, त्यांच्यावर अन्याय होतो’, असे म्हटले जाते. दुसरीकडे हिंदूंची मंदिरे पाडण्याची जाहीर वाच्यता करूनही एकदम सामसूम ! हाच तर निधर्मीपणा (अधर्मीपणा) अथवा ‘सेक्युलॅरिझम’ आहे.

धर्मांधांचा हिंदुद्वेष !

धर्मांधांकडून हिंदूंना दिले जाणारे सरबत, दूध, जेवण, पाव, बिर्याणी यांपासून ते प्रत्येक पदार्थात थुंकून अथवा लघवी करून दिले जाते. या किळसवाण्या कृतीचे असंख्य व्हिडिओ हिंदूंनी ध्वनीचित्रमुद्रित करून ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. हिंदूंना दिल्या जाणार्‍या भाज्या, फळे गटाराच्या पाण्यातून बुडवून काढली आहेत. हिंदुद्वेषी मानसिकता असणार्‍या धर्मांधांकडून शुचिर्भूततेची अपेक्षा आणि तेही हिंदूंच्या सणात कधी करू शकतो का ? देव-धर्म कार्य करतांना हिंदु धर्मीय व्यक्ती स्वत: शुचिर्भूत होतेच, त्यासाठी मंत्रोच्चार करते, त्या देव-धर्म कर्माचा अधिकार प्राप्त करून घेते आणि नंतरच पूजा-विधी आदी कर्म करतो. हिंदू जर स्वत: एवढी साधन-सुचिता पाळत असतील, त्यासाठी आवश्यक तो उपवास, सुवेरसुतक पाळत असतील, तर साहजिकच ती इतरांनी पाळलीच पाहिजे. अशी साधन-सुचिता पाळून केलेली पूजाच फलद्रूप होते, यावर हिंदु समाजाची श्रद्धा आहे. पूर्वापार तो हे करत आलेला आहे. या प्रक्रियेत जर कुणाकडून व्यत्यय आणला जात असेल, तर तो रोखणे त्याचा अधिकारच आहे. आता काहीच दिवसांपूर्वी हिंदूंचा जगातील सर्वांत मोठा मेळा महाकुंभमेळा पार पडला. या वेळीही मुसलमान व्यापार्‍यांवर बहिष्कार घातलेला होता. याविषयी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी समर्थन करतांना सांगितले की, जो सनातनच मानत नाही, त्यांनी सनातन धर्मियांच्या मेळ्यात येण्याचे कामच काय ? किती अगदी रास्त उत्तर आहे हे ! जो हिंदु धर्म, हिंदु धर्मियांच्या परंपरा मानतच नाही, त्यांनी हिंदु धर्मियांमध्ये येऊन व्यापार करून पैसे कमवणे चुकीचेच आहे. एरव्ही हिंदूंना न्यायालयाचा आदेश असूनही ५ वेळा अजान ऐकावी लागते, हिंदूंची मिरवणूक मशीद अथवा दर्गा येथे आल्यावर ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगतात, अन्यथा थेट दगडफेक केली जाते, अशांशी संबंध कशाला ठेवायचे ? असे हिंदु समाजाला वाटणारच ! मंत्री नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे मुसलमानांनी स्वत:त पालट केला नाही, तर असे प्रकार राज्यभर होतील. राज्याचे अनुकरण अन्य राज्येही करू शकतात. हिंदूंनी किती काळ धर्मांधांच्या भीतीच्या सावटाखाली रहायचे ? हिंदूंनी किती काळ धर्मांधांचे अत्याचार आणि विकृती सहन करायची ? शेवटी सहिष्णु हिंदु समाजाच्या सहनशीलतेला मर्यादा आहेच. आर्थिक बहिष्काराचे मोठे आयुध हिंदूंना मिळाले आहे. त्या बळावर धर्मांधांच्या दांडगाईला संघटितपणे उत्तर देऊ शकतो. शेवटी ‘भाई-चारा’ एकाच बाजूने कधीही होणार नाही. आतापर्यंत ‘भाई-चारा’ निभावणार्‍या हिंदूंना चार्‍याप्रमाणे धर्मांधांनी गिळले आहे. हीच सावध होण्याची वेळ आहे !

धर्मांधांची दांडगाई आणि हिंदुद्वेष यांना हिंदू आर्थिक बहिष्कारानेच उत्तर देऊ शकतात !