हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यान !

छत्रपती शिवाजी महाराज

विरार (जिल्हा पालघर) – तिरूपतीनगर, विरार (प.) येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य आणि सद्यःस्थिती’ या विषयावर समितीचे श्री. प्रथमेश कुडव यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमातून बोध घेऊन महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्वांनी कटीबद्ध होऊया, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. त्याला उपस्थित शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला. एकता मित्र मंडळाचे पदाधिकारी श्री. संदीप पाटील, श्री. भुपेंद्र गवस तसेच धर्मप्रेमी श्री. उदय पेणकर यांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांकडून समितीचे श्री. प्रथमेश कुडव आणि सौ. रेणुका तावडे यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.