‘सायबर फॉर हर हेकोथान’ स्पर्धेत सुयश

नाशिक – सनातन संस्थेच्या गाजरवाडी, तालुका निफाड (जिल्हा नाशिक) येथील सनातनच्या साधिका कु. वैष्णवी गाजरे यांनी देहली येथील आयोजित स्पर्धा ‘सायबर फॉर हर हेकोथान’मध्ये देशात चौथा क्रमांक प्राप्त केला. यासाठी त्यांचा गुणगौरव करण्यात आला. त्यांनी या यशाचे सर्व श्रेय सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, तसेच आई-वडील आणि प्रेरणा देणारे नाशिकमधील सर्व साधक यांना दिले.