Chhava Reaction Screen Torned In Gujrat : ‘छावा’ चित्रपट पहातांना मोगलांचे दाखवण्यात आलेले अत्याचार सहन न झाल्याने तरुणाने फाडला पडदा !

भरुच (गुजरात) येथील चित्रपटगृहातील घटना

फाडलेला चित्रपटागृहाचा पडदा (वर्तुळात)

भरुच (गुजरात) – येथे आर. के. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट चालू होता. या वेळी छत्रपती संभाजी महाराजांवर मोगलांनी अमानवी अन्याय-अत्याचार केल्याचे यात दाखवण्यात आले आहे.

हे सहन न झाल्याने एका युवकाने चक्क येथील अग्नीशमन यंत्र काढून ते चित्रपटागृहाच्या पडद्यावर फेकले. त्यामुळे पडदाच फाटला. एवढ्यावरच न थांबता त्याने हातानेही पडदा फाडून टाकला. चित्रपटात व्यत्यय आल्याने इतर प्रेक्षक त्याच्यावर ओरडू लागले; मात्र तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पोलिसांनी या तरुणाला कह्यात घेतले. जयेश वसावा असे त्याचे नाव आहे. यानंतर दुसर्‍या पडद्यावर चित्रपट दाखवण्यात आला.

संपादकीय भूमिका

मोगलांनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे अत्याचार केले, ते चित्रपटातून दाखवत असतांना तरुणांना सहन होत नाही; मात्र तो राजेंनी धर्मासाठी कसा सहन केला असेल ? यातून बोध घेऊन हिंदूंनी धर्मतेज जागवणे आवश्यक !