अभियंत्‍याने चोरलेले १० भ्रमणभाष आणि २ भ्रमणसंगणक जप्‍त !

पिंपरी-चिंचवड (पुणे) – बेरोजगार उच्‍चशिक्षित तरुण अभियंता निखिल (पुसद, जिल्‍हा यवतमाळ) याने १० भ्रमणभाष आणि २ भ्रमणसंगणक चोरले. (नोकरी न मिळाल्‍याने चोरीचा मार्ग अवलंबणे हे तरुणांमधील कष्‍ट करण्‍याची मानसिकता आणि नीतीमत्ता संपल्‍याचे लक्षण आहे. गुन्हे करण्याची प्रवृत्ती रोखण्यासाठी कठोर कारवाईसह मनोबल वाढण्यासाठी धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. – संपादक) या घटनेच्‍या प्रकरणी निखिलला अटक करण्‍यात आली आहे.