ढाका (बांगलादेश) – ‘तौहिदी जनता’ या संघटनेशी संबंधित कट्टरतावादी मुसलमानांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने फुले विकणार्या एका दुकानाची तोडफोड केली. ही घटना १५ फेब्रुवारीला बांगलादेशाच्या टांगेल जिल्ह्यातील भूआपूर उपजिल्ह्यात घडल्याचे वृत्त आहे. ‘मामा गिफ्ट कॉर्नर’ असे या दुकानाचे नाव असून आलम नावाची व्यक्ती ते चालवते. आलम १४ फेब्रुवारीला दुकानातून फुले विकत होता. आलम याने सांगितले की, जमावाने त्याला सांगितले होते की, ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी फुले विकणे गुन्हा आहे.
१३ फेब्रुवारीला ‘निर्बिली फूड कॉर्नर’ नावाच्या दुकानावरही ‘तौहिदी जनता’च्या कार्यकर्त्यांनी असेच आक्रमण केले होते. कट्टरतावाद्यांनी या भोजनालयाबाहेर ‘प्रेमविरोधी’ निदर्शने केली. त्यांनी घोषणा देत, ‘जोडप्यांनी सार्वजनिकरित्या प्रेमाचे प्रदर्शन केल्यास त्यांना शारीरिक इजा केली जाईल’, अशी धमकी दिली. या सगळ्यात १५ फेब्रुवारीला भूआपूरमध्ये होणारा ‘वसंत महोत्सव’ही पुढे ढकलण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाशिवसेना, श्रीराम सेना यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ पक्ष अथवा संघटना यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध केल्यावरून त्यांना शहाणपणा शिकवणारे पुरो(अधो)गामी आता बांगलादेशात जाऊन या कट्टरतावादी मुसलमानांना उपदेशाचे डोस का पाजत नाहीत ? |