सनातन संस्कृती महासंघाचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना निवेदन !

अकोला – आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणार्या जोडप्यांना ‘ऑनर किलिंग’पासून संरक्षण मिळण्यासाठी राज्यात ‘सेफ हाऊस’ सिद्ध करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सरकारला दिले आहेत. प्रेमविवाह करणार्या जोडप्यांना संरक्षण प्रदान करणारा हा निर्णय आहे; मात्र सध्या वाढणार्या ‘लव्ह जिहाद’च्या अंतर्गत अन्य धर्मीय तरुण हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्या वेळी प्रसंगी शुद्ध हरपणारी अज्ञात औषधी, जडीबुटी किंवा अमली पदार्थ यांचाही वापर केला जातो. अशा मुलींचे नंतर काय होते ?, ते वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ‘सेफ हाऊस’ची निर्मिती करतांना आणि अशा जोडप्यांना अभय देतांना निश्चिती करावी. यातील अनेक विवाह ‘ब्लॅकमेलिंग’ किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याने होतात, अशा अनेक घटना राज्यात उघडकीस आल्या आहेत.
धार्मिक कट्टरवादातून असा प्रकार घडत असल्याचेही पोलिसांच्या अन्वेषणातून निदर्शनास आले. त्यामुळे अशा परिस्थितीचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. मुसलमान समाजातील एखादी तरुणी हिंदु तरुणाशी विवाह करत असेल, तरी अशा जोडप्याला समान तत्त्वावर सुरक्षा आणि ‘सेफ हाऊस’मध्ये स्थान देण्याची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक आहे. ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘शक्ती’ कायदा चर्चेत आहे. महिला लोकप्रतिनिधी म्हणून यावर अत्यंत गंभीरपणे विचार करावा, अशा आशयाचे निवेदन राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांना सनातन संस्कृती महासंघाच्या वतीने पाठवण्यात आले. महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख विजय केंदरकर, मिलिंद गायकवाड आणि देवानंद गहिले यांनी ही माहिती दिली.
संपादकीय भूमिका :क्वचित घडणार्या ‘ऑनर किलिंग’च्या घटनांसाठी ‘सेफ हाऊस’ची निर्मिती म्हणजे ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही; पण काळ सोकवेल’ ! |