वक्फ कायद्याच्या सुधारणांवरून खासदार असदुद्दीन ओवैसींचे हिरवे फुत्कार !

लोकसभेत ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलीमीन (ए.आय.एम्.आय.एम्.)’चे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणतात, ‘‘मी या सरकारला चेतावणी देत आहे की, जर तुम्ही सध्याच्या स्वरूपात वक्फ कायदा आणला, जो अनुच्छेद २५, २६ आणि १४ चे उल्लंघन करणारा आहे, तर त्यामुळे या देशात सामाजिक अस्थिरता निर्माण होईल. हा कायदा संपूर्ण मुसलमान समाजाने नाकारलेला आहे. या कायद्यामुळे वक्फची कोणतीही मालमत्ता शेष रहाणार नाही. तुम्हाला भारताला ‘विकसित भारत’ बनवायचे आहे. आम्हालाही ‘विकसित भारत’ हवा आहे. अशा प्रकारचा कायदा करून तुम्हाला या देशाला ८० आणि ९० च्या दशकात घेऊन जायचे असेल, तर ते तुमचे उत्तरदायित्व असेल; कारण एक अभिमानी भारतीय मुसलमान म्हणून मी माझ्या मशिदीची (वक्फची) एक इंचही भूमी गमावणार नाही. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही आता येथे येऊन राजकीय भाषण देणार नाही. या ठिकाणी मला हे सांगायचे आहे की, माझा मुसलमान समाज आणि आम्ही अभिमानी भारतीय आहोत. वक्फ भूमी ही आमची मालमत्ता आहे, ती आम्हाला इतर कुणीही दिलेली नाही. तुम्ही ती आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. वक्फ भूमी ही आमच्यासाठी पूजनीय आहे.’

श्री. भरत आदमपुरे

ओवैसींची ही ‘चेतावणी’, म्हणजे लोकनियुक्त सार्वभौम भारत सरकारला धमकी आहे, ‘आम्ही या देशात विशेष लोक आहोत. आमचा विशेष हक्क काढून घ्याल, तर आम्ही या देशात अराजक परिस्थिती निर्माण करू.’ स्वातंत्र्यानंतर या देशात अनेक भूमी सुधारणा कायदे झाले. हिंदु जमीनदारांच्या शेकडो-सहस्रो एकर भूमी सरकारने कह्यात घेतल्या. अनेक हिंदु जमीनदारांनी तर भूदान चळवळीत स्वतःहून सरकारला भूमी दान केल्या. हिंदू संस्थानिकांच्या मालमत्ता सरकारने कह्यात घेतल्या. त्यांचे भत्ते रहित केले; पण कुणीही हिंदु जमीनदाराने अराजक निर्माण करण्याची भाषा केली नाही; कारण ‘हे राष्ट्र आपले आहे आणि ही भूमी आपण आपल्याच राष्ट्राकडे देत आहोत’, अशी त्यांची भावना होती. वक्फ भूमीचे संपूर्ण राष्ट्रीयकरण तर दूरच राहिले, वक्फ कायद्यात केवळ काही सुधारणा करायचे म्हटले, तरी इस्लामी मानसिकता कशी फणा काढते, ते ओवैसींच्या वक्तव्यावरून दिसून येते; परंतु हा फणा चिरडून देशाला पुढे जावेच लागेल.

– श्री. भरत आदमपुरे, अभियंता, पुणे. (४. २. २०२५)