फलटण (सातारा) येथे ३ म्‍हशींची कत्तलीपासून मुक्‍तता !

  • सराईत गोतस्‍कर सलाम ताजुद्दीन कुरेशीसह एकावर गुन्‍हा नोंद !
  • बजरंग दल फलटण आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघाची संयुक्‍त कारवाई !
प्रतिकात्मक चित्र

फलटण (जिल्‍हा सातारा) – मानद पशूकल्‍याण अधिकारी अवधूत धुमाळ यांना एका पिकअप गाडीचा संशय आल्‍याने त्‍यांनी गाडी थांबवून चौकशी केली. त्‍यात सराईत गोतस्‍कर आणि ३ म्‍हशी आढळल्‍या. ती जनावरे फलटण येथील पशूवधगृहात कत्तलीसाठी जात असल्‍याचा संशय खरा ठरल्‍याने फलटणचा सराईत गोतस्‍कर सलाम ताजुद्दीन कुरेशी आणि दीपक अहिवळे यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करण्‍यात आला. ३ म्‍हशींची कत्तलीपासून मुक्‍तता करून त्‍यांना राजाळे येथील गोशाळेत पाठवण्‍यात आले. ‘बजरंग दल फलटण आणि अखिल भारत कृषी गोसेवा संघा’च्‍या वतीने ही संयुक्‍त कारवाई करण्‍यात आली. या प्रकरणी अवधूत धुमाळ यांनी फलटण पोलीस ठाण्‍यात तक्रार प्रविष्‍ट केली आहे.