Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु जनजागृती समितीकडून इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांना अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे निमंत्रण

प्रयागराज कुंभपर्व २०२५

डावीकडून डॉ. मुरलीधर दास, श्री. गौरांग दास, सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे

प्रयागराज : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना गोवा येथे येत्या जून मासात होणार्‍या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येण्याचे निमंत्रण दिले.

श्री. गौरांग दास, आणि सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे भेट

यासह सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. गौरांग दास यांना हिंदु जनाजागृती समिती करत असलेल्या समाज, राष्ट्र आणि धर्म, तसेच हिंदु राष्ट्र यांसाठी करत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. श्री. गौरांग दास यांनी समितीचे साधक हिंदुत्वाच्या कार्याला साधनेची जोड देत असल्याविषयी कौतुक केले आणि ‘हेच अपेक्षित आहे’, असे सांगितले.