
‘९.३.२०२४ या दिवशी सकाळी १०.४७ वाजता मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेव्हा मंदिराबाहेरील लादीवर पडलेला सूर्यप्रकाश परावर्तित होऊन तो सिद्धिविनायकाच्या मूर्तीच्या मुखावर दिसत होता.

त्यामुळे सिद्धिविनायकाची मूर्ती आणखी सुंदर दिसत होती, तसेच सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या छताच्या आतील भागातही सूर्यप्रकाश दिसत होता, परिणामी मंदिर नैसर्गिकदृष्ट्या प्रकाशमान झालेले दिसत होते.’
– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.३.२०२४)