Sri Lanka Arrested Fishermen : श्रीलंकेने ३४ भारतीय मासेमारांना केली अटक !

कोलंबो – श्रीलंकेच्या नौदलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध मासेमारी केल्याच्या प्रकरणी ३४ भारतीय मासेमारांना अटक केली आणि भारतीय मासेमारांच्या ३ नौकाही जप्त केल्या आहेत. २५ आणि २६ जानेवारीला भारतीय मासेमार श्रीलंकेच्या हद्दीत घुसून मासेमारी करतांना त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती श्रीलंकेच्या नौदल अधिकार्‍यांनी दिली.