Plan To Murder Advocate Vishnu Jain Exposed : संभल (उत्तरप्रदेश) येथील हिंसाचारारच्या वेळी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हत्येचा होता कट !

  • आरोपी वारिस याने दिली स्वीकृती

  • वारिस यानेच या वेळी २ मुसलमान तरुणांची केली होती हत्या

आरोपी वारिस व अधिवक्ता विष्णु शंकर जैन

संभल (उत्तरप्रदेश) – येथे २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळी झालेल्या हिंसाचारात हिंदु पक्षाच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांची हत्या करण्यात येणार होती. यासाठी दंगलखोरांना शस्त्रेही वाटण्यात आली होती. हे षड्यंत्र शारिक साथा याने रचले होते. त्याचा साथीदार मुल्ला अफरोज याने शस्त्रेे पुरवली होती, अशी माहिती शारिक साथा याचा आणखी एका साथीदार वारिस याच्या चौकशीतून समोर आली. पोलिसांनी २५ जानेवारीला त्याला अटक केली. या हिंसाचारात वारिस याने २ मुसलमान तरुणांची गोळ्या झाडून हत्या केल्याचेही मान्य केले आहे. पोलिसांनी वारिसकडून एक पिस्तूल, काडतुसे आणि २ भ्रमणभाष संच जप्त केले.

पोलीस चौकशीत वारिस याने सांगितले की, शारिक साथा टोळीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना मारण्यासाठी शस्त्रे वाटली होती. शारिक साथा टोळीने म्हटले होते की, त्यांना मशिदीचे रक्षण करावे लागेल आणि सर्वेक्षणाच्या वेळी जैन यांचा खून करावा लागेल. शारिक साथाच्या टोळीला या हत्येद्वारे देशभर दंगली भडकवायच्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या अधिकारांसाठी लढणार्‍यांना, त्यांचे नेतृत्व करणार्‍यांना कशा प्रकारे संपवण्याचा कट रचला जातो, हे यातून दिसून येते ! केंद्र सरकारने याविषयी गांभीर्यांने लक्ष देऊन कृती करणे आवश्यक !
  • सातत्याने हिंदूंची हेटाळणी करणारे आणि मुसलमानांचे लांगूलचालन करणारा समाजवादी पक्ष याविषयी तोंड उघडेल का ?