सनातन संस्थेच्या प्रदर्शनातील अनुभव
प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभनगरीतील सेक्टर क्रमांक १९ येथे लागलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला कानपूर येथील भाविकांनी भेट दिली. श्री. रामबाबू दीक्षित नावाच्या एका भाविकाने काही महिन्यांपूर्वी एके ठिकाणाहून सनातनचे अत्तर विकत घेतले होते. या अत्तराचा उपयोग केल्यावर संस्थेचे आणखी साहित्य मिळवण्यासाठी ते वाराणसी, कानपूर असे बर्याच ठिकाणी फिरले; मात्र त्यांना कुठे सनातनची उत्पादने सापडली नाहीत. जेव्हा त्यांनी महाकुंभनगरीतील सनातनचे प्रदर्शन पाहिले, तेव्हा त्यांना आनंद झाला. सनातनचे एवढ्या मोठ्या संख्येत ग्रंथ आणि उत्पादने आहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी प्रत्येक साहित्यातील एक नग विकत घेतला. महाशिवरात्रीला श्री. दीक्षित भंडारा करतात. ‘या वेळी भंडार्याला सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक साहित्य सहस्रोंच्या संख्येत घेऊन भाविकांना वाटप करणार आहे’, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी त्यांच्या भागातील त्यांच्या सहकार्यांना दाखवण्यासाठी त्यांनी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्य घेतले.