Maulana Shahabuddin Razvi Controversial Statement : महाकुंभ मेळ्याच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा !

  • ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी यांची संतापजनक माहिती

  • मुसलमानांनी मोठे मन करून महाकुंभसाठी भूमी दिल्याचेही संतापजनक विधान

  • आखाडा परिषदेसह हिंदू संतप्त

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

मौलाना शहाबुद्दीन रझवी

बरेली (उत्तरप्रदेश) – प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याची सिद्धता चालू आहे; मात्र जेथे ही सिद्धता चालू आहे ती भूमी वक्फ बोर्डाची (मंडळाची) आहे. मुसलमानांनी मोठे मन दाखवून यावर आक्षेप घेतला नाही. बाबा लोक (हिंदूंचे साधु-संत) मुसलमानांच्या विरोधात आहेत. हा संकुचित दृष्टीकोन सोडून द्यावा लागेल.

मुसलमानांनी मोठे धाडस दाखवले आणि त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही. याचा विचार साधू-संतांनी करायला हवा, असे विधान ‘ऑल इंडिया मुस्लिम जमात’चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना (इस्लामचे अभ्यासक) शहाबुद्दीन रझवी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केले आहे. यापूर्वी रझवी यांनी कुंभमेळ्याच्या ठिकाणी मुसलमानांचे धर्मांतर होणार असल्याचा आरोप केला होता.


हे ही वाचा → कुंभमेळा ‘वक्फ बोर्डा’च्या भूमीवर असल्याचा दावा हा सनातनी लोकांच्या श्रद्धेला धक्का देण्याचा प्रयत्न ! – हिंदु जनजागृती समिती

संपादकीय भूमिका

  • यातून धर्मांध मुसलमान हिंदूंवर उपकार करत आहेत, हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतके झाल्यानंतरही वक्फ बोर्ड रहित न करणे, हिंदूंसाठी लज्जास्पदच ठरेल !
  • अशा उद्दाम मुसलमान नेत्यांवर सरकारने आताच कठोर कारवाई केली नाही, तर भविष्यात पूर्ण भारतच वक्फची भूमी आहे, हे सांगायलाही ते मागेपुढे पहाणार नाहीत !