Chandan Gupta Murder Case : चंदन गुप्ता हत्याकांड : २८ दोषी मुसलमानांना जन्मठेप !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाचा निकाल

हत्या करण्यात आलेला हिंदू तरुण चंदन गुप्ता

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – २६ जानेवारी २०१८ या दिवशी राज्यातील कासगंजमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेच्या वेळी चंदन गुप्ता या हिंदुत्वनिष्ठ तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा न्यायालयाने २८ मुसलमान हत्यार्‍यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासह प्रत्येकाला ५० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी ही शिक्षा सुनावली.

या २८ जणांमध्ये आसिफ कुरेशी उपाख्य हिटलर, अस्लम, असीम, शबाब, साकिब, मुनाजीर रफी, आमिर रफी, सलीम, वसीम, नसीम, बबलू, अक्रम, तौफिक, मोहसिन, राहत, सलमान, आसिफ जिमवाला, निशू, वासीफ, इम्रान, शमशाद, जफर, शाकीर, खालिद परवेझ, फैजान, इम्रान, शाकीर आणि जाहिद उपाख्य जग्गा यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण ?

२६ जानेवारी २०१८ या दिवशी प्रजासत्ताकदिनी चंदन गुप्ता इतर तरुणांसमवेत कासगंजमध्ये दुचाकी फेरी काढत होते. ही फेरी तिरंगा झेंडे घेऊन काढण्यात आली. ही फेरी मुलींच्या शासकीय आंतर महाविद्यालयाजवळ आली असता मुसलमान तरुणांनी फेरीवर आक्रमण केले. त्यांनी गोळीबार आणि दगडफेक केली. चंदन गुप्ता यांना लक्ष्य करून गोळ्या घातल्या. यात त्यांचा मृत्यू झाला. यानंतर कासगंजमध्ये प्रचंड हिंसाचार झाला.