फलक लावण्यास पोलीस प्रशासनाची अनुमती !
जत (जिल्हा सांगली) – शहरात ९ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरातील प्रमुख महाराणा प्रताप चौक येथे ‘अफझलखानवधा’चा भव्य फलक उभा केला, तसेच मंगळवार पेठ येथील मारुति मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक अशा ३ ठिकाणी प्रशासनाची अनुमती घेऊन शहरात ‘अफझलखानवधा’चे फलक लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
शहरात ८ डिसेंबर या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवप्रतापदिनानिमित्त ‘अफझलखानवधा’चे डिजिटल फलक लावण्यात आला होता; मात्र जत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्यांनी पोलीस पथकासह येऊन हा फलक जप्त केला होता. हा फलक जप्त करतांना तो फाडला गेल्याने या फलकाची विटंबना झाली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यात पोलिसांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या, तसेच हिंदुत्वनिष्ठांनी याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना दिल्यानंतर त्यांनीही पोलिसांच्या या कृतीचा निषेध करून अप्रसन्नता व्यक्त केली होती. अखेर पोलिसांनी या सर्व गोष्टींची नोंद घ्यावी लागली.
संपादकीय भूमिकाहिंदुत्वनिष्ठांनी स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात संघटितपणे वैध मार्गाने लढा दिल्यास त्यांना यश येते, हे यातून लक्षात येते |