मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणालीद्वारे वाहनांवर लक्ष्य !

पुणे – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ (इंटेलिजन्‍स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्‍टम) प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्‍ही बाजूंनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित छायाचित्रक बसवण्‍यात आले आहेत. रडारतंत्राचा वापर करून वाहनांचा वेग मोजण्‍यात येत असून वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवल्‍यास अशा वाहनांना ‘इ-चलान’ देण्‍यात येत आहे. महामार्गावर घाट परिसरामध्‍ये हलक्‍या मोटार वाहनांची (कार) वेगमर्यादा ६० कि.मी. प्रतिघंटा असून उर्वरित वाहनांची वेगमर्यादा ४० कि.मी. प्रतिघंटा आहे. इतर ठिकाणी हलके मोटार वाहनाची (कार) वेगमर्यादा १०० कि.मी. प्रतिघंटा असून उर्वरित वाहनांची वेगमर्यादा ८० कि.मी. प्रतिघंटा आहे.