![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/01/13230724/2023_Oct_Sandeep_Alshi_H_clr.jpg)
‘सध्याच्या आपत्काळात वाईट शक्तींचे त्रास पुष्कळ वाढले आहेत. त्यामुळे बहुतांशी साधकांवर दिवसभर मधे मधे काळे (त्रासदायक) आवरण येत असते. साधकांनी मधे मधे ते काढत रहावे. रात्री झोपायला जाण्यापूर्वी आवरण न काढल्यास रात्रभर आवरणयुक्त राहिल्याने वाईट शक्तींचे आक्रमण अधिक होण्याची शक्यता असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी १० मिनिटे खडेमिठाचे उपाय करावेत. पुष्कळ दमल्यामुळे खडेमिठाच्या पाण्यात पाय बुडवून उपाय करणे शक्य नसल्यास अंथरुणावर पहुडलेल्या स्थितीत दोन्ही हातांच्या मुठीत खडेमीठ घेऊन उपाय केले तरी चालतील. उपाय करतांना नामजपही भावपूर्ण करावा. झोपण्यापूर्वी काही वेळ नामजप केल्यास रात्रभर तो चालूही रहातो. यामुळे रात्रभर संरक्षककवच लाभण्यास साहाय्य होते.
मी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी वरीलप्रमाणे उपाय करतो. एखादा दिवस मला काही कारणास्तव असे उपाय करता आले नाहीत, तर त्या रात्री मला झोप नीट लागत नाही. थोडक्यात उपाय न केल्याचा परिणाम लगेच दिसतो. यावरून या उपायांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. आपण सर्वांनीच सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी शिकवलेले हे नामजपादी उपाय करूया आणि लवकर त्रासमुक्त होऊया !’
– पू. संदीप आळशी (२०.११.२०२४)
|