चैतन्याची मूर्ती असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेले विचार

सनातनच्या ६९ व्या संत पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांचा आज कार्तिक कृष्ण एकादशी (२६.११.२०२४) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या नणंद कु. शीतल पवार यांना आलेल्या अनुभूती आणि पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या सासूबाई सौ. मंदाकिनी पवार यांनी केलेली कविता पुढे देत आहोत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. (सौ.) अश्विनी अतुल पवार यांना ३५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! 

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याविषयी त्यांच्या नणंद कु. शीतल पवार (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांच्या नावाचा सुचलेला अर्थ 

१. रुग्णाईत असतांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या वाणीतील चैतन्यामुळे ऊर्जा मिळून उत्साह वाटणे : ‘नोव्हेंबर २०२३ मध्ये मला सतत मरगळ येत होती. तेव्हा मी पू. (सौ.) अश्विनीताईंना नामजपादी उपाय विचारण्यासाठी दूरभाष केला होता. त्या वेळी त्या बोलत असतांना त्यांच्या वाणीतील चैतन्यामुळे मला ऊर्जा मिळून उत्साह वाटला.

कु. शीतल पवार

२. रुग्णाईत असतांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा आधार वाटून त्यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांनी अल्प कालावधीत बरे वाटणे : वैद्यकीय पडताळणी केल्यानंतर मला डेंग्यू झाल्याचे समजले. तेव्हा पू. ताई माझ्या प्रकृतीची सतत विचारपूस करत होत्या. त्या कालावधीत मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. त्यांनी सांगितलेल्या उपायांमुळे मी अल्प कालावधीत बरी झाले.

३. अश्विनी नावाचा सुचलेला अर्थ

अ – सतत नंद देणारी

श्वि –श्वरी गुणांची खाण असलेली

नी – निरपेक्ष प्रीती करणारी

– कु. शीतल केशव पवार (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ३६ वर्षे), बार्शी. (३०.१०.२०२४)

पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या सासूबाई सौ. मंदाकिनी पवार (वय ६२ वर्षे) यांनी केलेली कविता 

चैतन्यमूर्ती पूज्य सौ. अश्विनीताई ।
मधुर हास्य, मधुर वाणी ऐकतच रहावी क्षणोक्षणी ।। १ ।।

सौ. मंदाकिनी पवार

पण पडते उणे मी करण्यास ग्रहण ।
संतांचा सत्संग
भाग्याने लाभतो हेच खरे ।। २ ।।

सून म्हणूनी न पहाता निश्चल भाव
वाढू दे पूज्य ताईच्या चरणी ।
एवढीच विनवणी गुरुदेव तुमच्या पावन चरणी ।। ३ ।।

अशी सून मिळणे ना विचार होता कधी ।
‘न भूतो न भविष्यति’ ही केवळ गुरुदेवांची अपार प्रीती ।। ४ ।।

मिळतो सहवास कधीतरी चैतन्याची होते उधळण ।
किती जन्म घेऊ, तरी गुरुदेव तुमचे ऋण फिटणार ना कधी ।। ५ ।।

अज्ञानी लोक विचारत असती सतत ।
मग गुरुदेव सुचवतात कसे, सून असे आमची चैतन्याची मूर्ती ।। ६ ।।

एक नव्हे, तर सात पिढ्यांचा उद्धार करण्या ।
घेतला तिने जन्म पृथ्वीवरती ।। ७ ।।

गुरुदेव माझे त्रिलोकाचे अधिपती ।
आमचा सर्व भार घेतला त्यांनी स्वतःवरती ।। ८ ।।

पूज्य ताईची प्रेरणा घेऊन ।
पुढे कसे जाऊ विचार येती ।। ९ ।।

आजच्या या शुभदिनी प्रार्थना करते ।
आशीर्वाद द्यावा तिला साधनेस मिळण्यास स्फूर्ती ।। १० ।।

– सौ. मंदाकिनी केशव पवार (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६२ वर्षे), बार्शी (३०.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक