Canada Temple Attack Case : ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील हिंदु मंदिरावरील आक्रमणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक आणि सुटका

खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा सहकारी

इंद्रजित गोसल व गुरपतवंत सिंग पन्नू

ब्रॅम्पटन (कॅनडा) – येथे हिंदु सभा मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणार्‍या इंद्रजित गोसल (वय ३५ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उपस्थित केल्यानंतर न्यायालयाने काही अटी घालून त्याची सुटका केली. त्याच्यावर हिंदूंवर धारदार शस्त्राने आक्रमण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यापूर्वी मंदिरावर आक्रमणाच्या प्रकरणी ३ जणांना अटक केली आहे.

इंद्रजित गोसल ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याच्या जवळचा सहकारी आहे. ग्रेटर टोरंटो येथील हिंदु मंदिरावर आक्रमण करण्याचा कटही इंद्रजित गोसल यानेच आखला होता.

संपादकीय भूमिका

अशांना कॅनडातील ट्रुडो सरकार शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार आहे का ?