धर्माचे मुख्य प्रयोजन काय ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती

दुर्दैवाने मनुष्य अर्थ-काम यांत गढून जातो. त्यांनाच सुख सर्वस्व किंवा सुख सर्वस्वाची साधने मानतो. धर्माकडे त्याचे पूर्ण दुर्लक्ष होते. मोक्षाची तर त्याला जाणीवही रहात नाही. मोक्ष ही निरतिशयानंद प्राप्त करून देणारी अवस्था आहे. धर्म त्या अवस्थेच्या प्राप्तीचा मार्ग दाखवतो वा साधना सांगतो. स्वैर होणार्‍या अर्थ, काम यांवर नियंत्रण ठेवणे हे धर्माचे मुख्य प्रयोजन !

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘ईशावास्योपनिषद्’)