विशाळगड आणि पन्हाळा गडांवरील अतिक्रमण तात्काळ काढण्याच्या सूचना ! – राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना

शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके (उजवीकडून दुसरे) यांना निवेदन देताना श्री सुनील घनवट (मध्यभागी)

कोल्हापूर, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – विशाळगडावर जे उर्वरित अतिक्रमण आहे ते, तसेच पन्हाळा गडावरील अतिक्रमण तात्काळ निघण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी सूचना दिल्या. याचसमवेत विशाळगडावर नरवीरांच्या ज्या दुर्लक्षित समाध्या आहेत, तसेच गडांवर जी मंदिरे आहेत, त्यांचा जिर्णाेद्धार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट आणि श्री. मधुकर नाझरे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चे श्री. आनंदराव पवळ यांनी विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात श्री. राजेश क्षीरसागर यांची भेट घेतली असता त्यांनी हे आश्वासन दिले.

शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट, तसेच अन्य
शिवाजी विद्यापीठ नामांतराचे सूत्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडू ! – चंद्रदीप नरके, आमदार, शिवसेना

‘शिवाजी विद्यापिठा’चे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करण्याविषयी शिवसेनेचे आमदार श्री. चंद्रदीप नरके यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर श्री. नरके यांनी हा विषय येणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘लक्षवेधी’ सूत्राद्वारे मांडू, असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.