
पुणे – भारती विद्यापिठाच्या परिसरात गुंडांनी हॉटेलचालक अमित खैरे यांना बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हॉटेलचालकाचे प्राण वाचले; पण त्यांची दुचाकी जळून खाक झाली आहे. उपस्थित लोकांनी साहाय्य न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली. (माणुसकी संपत असल्याचे द्योतक ! अशी जनताही मार खाण्याच्याच लायकीची आहे ! – संपादक) या घटनेतील काही मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून ते गुन्हेगार आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत; म्हणून पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी विनंती अमित खैरे यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेबारा वाजता कात्रज परिसरातील एका हॉटेलच्या बाहेर काही तरुणांमध्ये वाद होऊन त्यांचे हाणामारीत रूपांतर झाले. अमित खैरे यांनी या तरुणांना ‘आमच्या हॉटेल समोर भांडणे करू नका’, असे सांगितले; पण संतापलेल्या या गुंडांनी खैरे यांच्यावरच आक्रमण केले, सिमेंटचा ब्लॉक फेकून मारला. त्यानंतर अमित खैरे हे भारती विद्यापिठाच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले. तक्रार देऊन ते रुग्णालयात जात असतांना त्या गुन्हेगारांनी त्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर पुन्हा बाचाबाची करत मारहाण केली आणि बाटलीतून आणलेले पेट्रोल त्यांच्या अंगावर टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
संपादकीय भूमिका :
|