|
फरीदाबाद (हरियाणा) : येथील बल्लभगडच्या सुभाष कॉलनीत मुसलमानांच्या छळाला कंटाळून एका पीडित हिंदु कुटुंबाने ‘हे घर विक्रीसाठी आहे’, असा फलक घराबाहेर लावला आहे. पूर्वी येथील बहुतांश घरे हिंदूंची होती; मात्र हिंदूंनी पलायन केल्याने आता बहुतांश घरे मुसलमान समाजाची झाली आहेत. पीडित हिंदु कुटुंबातील एक मुलगा दिवाळीला फटाके फोडत असतांना शेजारी रहणार्या मुसलमान समाजातील तरुणांनी त्याच्यावर आक्रमण केले. परिसरातील ५० ते ६० मुसलमानांनी पीडित कुटुंबाच्या घरावर विटा आणि दगड फेकून घराचा मुख्य दरवाजा तोडला. धर्मांधांनी घरात घुसून महिलांनाही मारहाण केली. महिलांची छेडछाड केली. कुटुंबातील मुलीचा विनयभंग केला आणि तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. पीडित हिंदु कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. (हिंदूंवर अशी परिस्थिती ओढवण्यास फरीदाबाद भारतात आहे कि पाकिस्तानात ? हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पद ! – संपादक)
पीडित कुटुंबातील महिलेने सांगितले की, जेव्हा तिने या घटनेची पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हा धर्मांध मुसलमानांनी तिला घाबरवून तक्रार मागे घेण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
काश्मीरसारखी स्थिती निर्माण केली ! – पीडित हिंदु कुटुंब
पीडित कुटुंबाचे प्रमुख दुर्गा प्रसाद म्हणाले की, त्यांना भजन, कीर्तन करण्याची अनुमती नाही. सण साजरे करता येत नाहीत. येथे ३० वर्षांपासून रहात आहेत. पूर्वी वातावरण इतके खराब नव्हते; कारण मुसलमानांची संख्या अल्प होती. आता संख्या वाढली आहे. या लोकांनी येथे एक प्रकारचा काश्मीर निर्माण केला आहे.
संपादकीय भूमिका
|