वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी हुब्बळ्ळीमध्ये केलेली दंगल
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने १६ एप्रिल २०२२ मध्ये हुब्बळ्ळी येथील दंगलीच्या प्रकरणातील खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनच्या (‘ए.आय.एम्.आय.एम्.’च्या) नेत्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले होते.
धर्मांध मुसलमानांच्या जमावाने हुब्बळ्ळी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून पोलिसांना मारहाण केली होती. याच वेळी जवळच्या हनुमान मंदिर आणि रुग्णालय यांनाही लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. यात १२ पोलीस घायाळ झाले होते, तर नंतर १०० जणांना अटक करण्यात आली होती. यात हुब्बळ्ळी-धारवाड महापालिकेचे नगरसेवक नजीर अहमद यांचाही समावेश होता. ए.आय.एम्.आय.एम्.चा नेता मौलाना वसीम जमावाला भडकावण्यात सहभागी होता. तोच दर्ग्यात चिथावणीखोर भाषण देत होता आणि पोलीस ठाण्याबाहेर जमावासमवेतही होता.
सौजन्य : India Today
संपादकीय भूमिकादगंलखोर मुसलमानांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! यातूनच ‘काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट’च, हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात न्यायालयाने स्वतःहून दखल घेत यावर सुनावणी केली पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते ! |