Protest Against Illegal Shimla Mosque : मशीद पाडण्‍याची मागणी करणार्‍या हिंदूंवर पोलिसांकडून लाठीमार, अनेक हिंदू घायाळ !

शिमला येथील बेकायदेशीर मशिदीच्‍या विरोधातील आंदोलन चिघळले !

शिमला येथे संजौली भागात उभी असलेली ५ मजली बेकायदेशीर मशीद

शिमला (हिमाचल प्रदेश) : राजधानी शिमला येथे संजौली भागात उभी असलेली ५ मजली बेकायदेशीर मशीद पाडण्‍याची मागणी आता तीव्र झाली आहे. ११ सप्‍टेंबरच्‍या सकाळी हिंदू मोठ्या संख्‍येने मशिदीच्‍या दिशेने चालू लागले. त्‍या वेळी पोलिसांनी हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री कमल गौतम यांना अटक केली.

हिंदु जागरण मंचचे माजी महामंत्री कमल गौतम यांना अटक

त्‍यामुळे संतापलेल्‍या हिंदूंनी आंदोलन तीव्र केले. पोलिसांनी हिंदूंना अडवत त्‍यांच्‍यावर लाठीमार केला, तसेच पाण्‍याचा जोरदार मारा केला. यात अनेक हिंदू घायाळ झाल्‍याचे वृत्त आहे.

मशिदीच्‍या दिशेने चाललेले हिंदू

१. राज्‍यातील काँग्रेस सरकारने या बेकायदेशीर मशिदीला हिंदूंनी विरोध करू नये, यासाठी तेथील परिसराचे छावणीत रूपांतर केले होते. येथे मोठ्या प्रमाणात अडथळे (बॅरिकेड्‍स) निर्माण करण्‍यात आले आहेत.

२. नि:शस्‍त्र हिंदु आंदोलक संजौली येथे पोचताच पोलिसांनी त्‍यांच्‍यावर लाठीमार चालू केला. (असे आंदोलन धर्मांध मुसलमान करत असते, तर पोलिसांनी अशा प्रकारे काठ्या उगारल्‍या असत्‍या का ? हिंदू निश:स्‍त्र आंदोलने करतात. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावरच शस्‍त्र चालवले जाते का, याचाही आता विचार व्‍हावा का ? – संपादक)

३. गेल्‍या आठवड्याभरापासून सरकारला संजौली मशीद वादावर कोणताच तोडगा काढता आलेला नाही.

काय आहे प्रकरण ?

३१ ऑगस्‍ट या दिवशी स्‍थानिक तरुण यशपालचा काही मुसलमान मुलांसमवेत वाद झाला होता. त्‍यानंतर मुसलमानांनी यशपालवर आक्रमण करून त्‍याला गंभीर घायाळ केले. त्‍यानंतर हे तरुण संजौलीच्‍या मशिदीत लपून बसल्‍याचे समोर आले. या ठिकाणी जमलेल्‍या हिंदूंनी या तरुणांवर कारवाई करण्‍यासमवेतच ही मशीद बेकायदेशीर असल्‍याचे सांगितले. पोलिसांनी गुलनवाझ, सारिक, सैफ अली आणि रोहित अशा चौघांना अटक तर केली; परंतु या घटनेमुळे केंद्रस्‍थानी आलेल्‍या या मशिदीवर मात्र नमती भूमिका घेतली. स्‍थानिक हिंदूंनी आरोप केला आहे की, या ५ मजली मशिदीतील केवळ २ मजले कायदेशीर आहेत. उर्वरित ३ मजले हे वर्ष २०१० नंतर बांधण्‍यात आले. शिमला महानगरपालिकेने हे बांधकाम चालू असतांना मशिदीला ३०-३५ नोटिसा पाठवल्‍या होत्‍या; परंतु बांधकाम थांबवले नाही. महापालिकेने आजूबाजूचे बेकायदेशीर बांधकाम पाडले; परंतु या मशिदीवर एक हातोडाही चालवला नाही. आज ही ५ मजली मशीद शहराच्‍या मध्‍यभागी उभी आहे. हे प्रकरण अद्याप न्‍यायालयात असल्‍याचे राज्‍यातील काँग्रेस सरकारने सांगून यातून स्‍वत:चे हात झटकले आहेत.

संपादकीय भूमिका

  • हिमाचल प्रदेशची सत्ता असलेल्‍या काँग्रेस सरकारच्‍या पोलिसांचा बेकायदेशीर मशिदीवर नाही, तर हिंदूंवर दडपशाहीचा अवलंब !
  • मुसलमानांच्‍या विरोधात काही घडले, तर पोलीस आणि न्‍याययंत्रणा त्‍वरित त्‍यांच्‍या रक्षणार्थ उभ्‍या रहातात. आता बेकायदेशीर मशिदीच्‍या विरोधात स्‍वत: काही करायचे नाही आणि हिंदूंनी त्‍याच्‍या विरोधात आवाज उठवला, तर त्‍यांच्‍यावर लाठ्या उगारायच्‍या, हाच काय पोलिसांचा पुरुषार्थ ?
  • जी काँग्रेस वक्‍फ कायदा आणून मुसलमानांचे लांगूलचालन करते, तिच्‍या पोलिसांकडून आणखी कोणती अपेक्षा करणार ?